शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या टोइंग वाहनाने दांपत्याला उडविले महिला अत्यवस्थ : घटनास्थळाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 02:04 IST

नाशिक : शहरात रस्त्याला अडथळा ठरणारे वाहन उचलून रस्ता मोकळा करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनाने शुक्रवारी (दि. २७) सकाळी शरणपूर रोडवरील रचना हायस्कूलसमोर दुचाकीला राँग साइडने ठोस दिल्याने त्यात पती-पत्नी रस्त्यावर कोसळले.

नाशिक : शहरात रस्त्याला अडथळा ठरणारे वाहन उचलून रस्ता मोकळा करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनाने शुक्रवारी (दि. २७) सकाळी शरणपूर रोडवरील रचना हायस्कूलसमोर दुचाकीला राँग साइडने ठोस दिल्याने त्यात पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. या महिलेच्या डोक्याला गंभीर मार बसला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून अवघ्या काही फूट अंतरावर ही घटना घडूनही त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेला चारचाकी लोटगाडीवरून दवाखान्यात दाखल करावे लागले. सातपूरच्या श्रमिकनगर भागात राहणारे शशिकांत अहिरे हे आपली पत्नी माया यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्कूटीने घेऊन जात असताना रचना शाळेजवळ राँग साइडने आलेल्या पोलिसांच्या टोइंग वाहनाने (क्र. एमएच १५ जीआर- १६९८) त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही पती-पत्नी रस्त्यावर कोसळले, मात्र पाठीमागे बसलेल्या माया अहिरे ह्या डोक्यावर पडल्याने जागीच बेशुद्ध झाल्या. दरम्यान, हा अपघात होताच, पोलिसांचे टोइंग वाहन तितक्याच गतीने पुढे निघून गेले. दरम्यान, जखमी माया अहिरे यांना उपचारार्थ अगोदर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून नंतर श्रमिक नगरच्या संकल्प हॉस्पिटलला दाखल करण्यात आले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने रक्ताच्या उलट्या होत असल्याचे शशिकांत अहिरे यांनी सांगितले.चौकट=हातगाडीवरून नेले रुग्णालयातपोलिसांच्या टोइंग वाहनाने रस्त्यावर पडलेल्या माया अहिरे यांना रुग्णालात दाखल करण्यासाठीदेखील पोलीस मदतीला आले नाहीत. रक्तस्त्राव व बेशुद्धावस्थेत असलेल्या अहिरे यांना अखेरीस कांदा, बटाटा विक्री करणाऱ्या चारचाकी हातगाडीवरून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.चौकट===वाहतूक पोलीसच प्रत्यक्षदर्शीवाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनावर अमोल अहिरेनामक पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. त्याच्या हजेरीतच वाहनचालक बेफामपणे वाहन चुकीच्या दिशेने हाकत होता. अपघात केल्यानंतर साधी विचारपूस न करता पोलिसासमवेत चालकानेही वाहन घेऊन धूम ठोकली. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या दंड वसुली चौकीसमोरच हा अपघात घडला. या अपघातानंतर दिवसभर सदरचे टोइंग वाहन पोलिसांनी लपवून ठेवल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक