शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

बलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:41 IST

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ पंकज सुरेश काटे (रा़ पंडितनगर, मोरवाडी, सिडको, नाशिक) असे शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, पुणे ग्रामीण मुख्यालयात तो कर्तव्यावर आहे़

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ पंकज सुरेश काटे (रा़ पंडितनगर, मोरवाडी, सिडको, नाशिक) असे शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, पुणे ग्रामीण मुख्यालयात तो कर्तव्यावर आहे़ जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण सुरू असताना आजारी पडल्याने पंकज काटे याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते़ या ठिकाणी काम करीत असलेल्या नर्ससोबत काटे याचे प्रेमसंबंध निर्माण झाले़ या युवतीस विवाहाचे आमिष दाखवून २००७ ते २०११ या कालावधीत नाशिक,बलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी(पान १ वरून)पुणे अशा विविध ठिकाणी नेऊन उपनिरीक्षक काटे याने शारीरिक अत्याचार केले़ मात्र, पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर आरोपी काटे याने विवाहाचे आश्वासन पाळले नाही तसेच बळजबरीने शारीरिक अत्याचार (बलात्कार) केल्याची फिर्याद पीडित युवतीने अंबड पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये दिली होती़जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांनी केला होता, तर सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात मूळ फिर्यादी, तिची नर्स मैत्रिण, हॉटेलचा मॅनेजर, डॉक्टर व राजपूत अशा पाच जणांची साक्ष घेतली़ यामध्ये पीडितेची मैत्रिण ही फितुर झाली होती़ मात्र, सरकारी वकिलांनी साक्षीदारांचे जबाब तसेच परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडून काटेविरोधात सबळ पुरावे सादर केले़न्यायाधीश घोडके यांनी आरोपी पंकज काटे यास बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम कलम (७)अन्वये सहा महिने कारावास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा ही कंकरंट भोगावयाची असून, २५ हजार पाचशे रुपये दंडापैकी २० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही देण्यात आले आहे़पीडित युवती सज्ञान असून, तिच्या संमतीनेच दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, त्यास बलात्कार म्हणता येणार नाही, असा बचाव त्यांनी केला़ पीडित युवती सज्ञान असली तरी विवाहाच्या आश्वासनामुळेच तिने शारीरिक संबंधास संमती दिल्याचा आम्ही युक्तिवाद केला़ तसेच या खटल्यात तिची नर्स असलेली मैत्रिणही फितूर झाली होती़ मात्र, हॉटेल मॅनेजर, डॉक्टर व तपास अधिकारी यांचा जबाब व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले व त्या आधारे आरोपी दोषी ठरविण्यात आले़- अ‍ॅड़ रवींद्र निकम, सरकारी वकील, जिल्हा न्यायालय