शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातून आरोपीचा पोबारा

By admin | Updated: May 16, 2017 00:40 IST

नाशिक : तालुका पोलीस ठाण्यातून घरफोडी व दरोडाप्रकरणी अटकेत असलेला संभाजी विलास कवळे याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तालुका पोलीस ठाण्यातून घरफोडी व दरोडाप्रकरणी अटकेत असलेला संभाजी विलास कवळे याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. कवळेला शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात पेट्रोलपंपावरील दरोडाप्रकरणी अटक केल्यानंतर त्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली होती. कवळेला सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सकाळी ११.५ मिनिटांनी ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आणले. मात्र येथे आरोपींना ठेवण्यासाठी कोठडीची व्यवस्था नसल्याने कवळेला पोलीस ठाण्यातच बसविण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांचे कवळेकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेऊन पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पोबारा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी कवळेला मातोरी येथील मोहिते यांच्या घरी दरोडा घातल्याप्रकरणी चौकशीसाठी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि.१५) ताब्यात घेतले होते. संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास पोलिसांचे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून कवळेने हातातील बेडी हळूहळू काढण्याचा प्रयत्न केला. हातातून बेडी निघाल्यांतर त्याने पोलीस ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या ठेंगण्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. ही घटना पोलिसांच्या दोन तीन मिनिटांनी लक्षात आली. तोपर्यंत कवळे पोलीस ठाण्याच्या परिसरातून निसटल्याने पाठलाग करूनही त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले. पोलीस त्याच्या मागावर असून, लवकरच कवळेला पकडण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.