र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाहीस्नानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, पहिल्या पर्वणीतील बंदोबस्ताच्या त्रुटी टाळून दुसऱ्या पर्वणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कुशावर्तावर भाविकांना स्नान करता यावे यासाठी येथील बंदोबस्त काहीप्रमाणात कमी करण्यात येणार आहे. पहिल्या शाहीस्नानाच्या वेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असला तरी त्यामुळे भाविकांना घाटावर पोहचणे शक्य झाले नव्हते तर कुशावर्तावर भाविकांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक असल्याने आखाड्यांच्या महंतांनी आणि साधूंनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. बंदोबस्ताची अतिरेक झाल्यामुळे चौफेर टीका झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील बंदोबस्तात काही बदल करण्यात आले आहेत. आखाड्यांच्या मागणीनुसार कुशावर्त तीर्थावर पोलीस बंदोबस्त एकचतुर्थांशने कमी करण्यात येणार आहे. शाहीस्रानाच्या वेळी पहाटे तीनपासून दुपारी १२ वाजेपर्यंत गरजेपुरताच पोलीसबंदोबस्त कुशावर्ता$$$वर ठेवण्यात येणार आहे. शिवाय नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार त्र्यंबकमधील बॅरिकेड्स आणि पोलीस बंदोबस्त काही प्रमाणात कमी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. भाविकांच्या परतीच्या मार्गात बदल४रविवार, दि. १३ रोजी असणाऱ्या दुसऱ्या पर्वणीचे शाहीस्नान क्रमानुसार पार पडल्यानंतर भाविकांना कुशावर्त स्रानासाठी खुले करण्यात येणार आहे. या पर्वणीत भाविकांना जव्हारफाटा येथून नगरपालिका, खंडेराव महाराज मंदिर, सुंदराबाई मठ, तेली गल्ली या मार्गे कुशावर्त जव्हारफाटा येथील बसस्थानकावर परततील असा प्रयोग केला जाणार आहे. यामुळे भाविक मोठ्या संख्येने शाहीस्रान करू शकतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. ४पोलीस अधीक्षकांनी पर्वणी मार्गाची पाहाणी करून काही सूचना केल्या आहेत. पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, प्रवीण मुंढे यांच्यासह पोलीस ताफ्याने त्र्यंबकनगरीत ठिकठिकाणी पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यांनी कुशावर्त चौक, शाहीमार्ग, त्र्यंबकेश्वर मंदिर, जव्हार फाटा आदि विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थिती समजावून घेतली.
कुशावर्तावरील पोलीस बंदोबस्त सैलत्
By admin | Updated: September 11, 2015 23:20 IST