शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
3
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
4
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
5
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

हरसुलला पोलिसांनी केला अवैद्य मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क! वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूल पोलिसांना गुरुवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गोपीनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत कारसह ६ लाख ४७ हजार ४० रु पयांचा मद्यासाठा अवैद्यरित्या माल हरसूल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ठळक मुद्दे पोलीस कर्मचारी जखमी : अंधाराचा फायदा घेत चालक फरारमात्र यावेळी कारच्या धडकेने पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, हरसूल येथील ग्रामीण रु ग्णालयातील उपचारानंतर त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात हरसूल पोलिसांनी तीन वाह

हरसूल पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरु वारी (दि. २७) रोजी पहाटे १.५० वाजेच्या सुमारास ठाणापाडा कडून अवैद्य मद्याची वाहतूक करणारे वाहन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने हरसूल येथील शनी मंदिर चौकातील मुख्य रस्त्यावर पोलीस कर्मचारी बॅरिगेटिंग लावत असताना अचानकपणे अवैद्यरित्या वाहतूक करणाºया वाहनाने धडक दिल्याने पोलीस हवालदार ए. बी. भोये यांच्या तोंडाला, डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. तर पोलीस हवालदार डी. ए. बोडके यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी मद्य वाहतूक तस्कराने याचा फायदा घेत हरसूल गावातील इंदिरानगर झोपटपट्टीत बेवारसपणे स्विफ्ट कार (डी. एन. ०९, के व्ही ०४७३) सोडून पलायन केले. हरसूल पोलिसांनी या वाहनांची तपासणी केली असता मुद्देमाल आढळून आला. याबाबत हरसूल पोलीस स्टेशनला अनोळखी चालकाविरु द्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कलामान्वये व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली कार सिल्व्हासा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिह, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शिर्मष्ठा वालावलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, पोलीस कर्मचारी डी. ए. बोडके, रतन शिंगाडे, मोहित सोनवणे, के. के. भोये, सुनील तुंगार, उमेश बच्छाव आदींनी ही कारवाई केली.