इगतपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आगामी रमजान पर्व व महाराष्ट्रात बुधवारी (दि.१४) रात्री ८ वाजेपासुन लागू होणाऱ्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीत पोलिसांनी रुट मार्च काढला.इगतपुरी शहरात व परिसरात उत्सव काळासह लॉकडाऊन काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला.इगतपुरी शहरातील मुंबई आग्रा जुना महामार्ग, पटेल चौक, तीन लकडी परीसर व भाजी मार्केट या मार्गाने पोलिसांनी संचलन केले. राज्यात दि १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील.लॉकडाऊनच्या काळात शासनाने परवानगी दिलेल्या अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरु असतील इतर दुकाने उघडण्यास शासनाने बंदी घातली असुन बंदी असलेले दुकान उघडल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी दिली.
इगतपुरीत पोलिसांचा रुट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 00:17 IST
इगतपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आगामी रमजान पर्व व महाराष्ट्रात बुधवारी (दि.१४) रात्री ८ वाजेपासुन लागू होणाऱ्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीत पोलिसांनी रुट मार्च काढला.
इगतपुरीत पोलिसांचा रुट मार्च
ठळक मुद्देकोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला.