शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

१९ मसाज सेंटरवर पोलिसांचे छापे

By admin | Updated: October 9, 2016 01:06 IST

बहुतांशी स्पा सेंटरमधील साधनसामग्री व कर्मचारी गायब असल्याने संशय

नाशिक : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय करण्याचा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालला आहे़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि़७) शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड आदि भागात सुरू असलेल्या १९ स्पा सेंटरवर अचानक छापे टाकले़ यातील बहुतांशी स्पा सेंटरमधील साधनसामग्री व कर्मचारी गायब असल्याने संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, एन्झी स्पा मसाज सेंटरचा मालक संशयित हेमंत परिहार व निलोफर शेख यांच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे़पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी बुधवारी (दि़५) कॉलेजरोडवरील ठक्कर मॅजेस्टी या व्यावसायिक इमारतीत सुरू असलेल्या एन्झी स्पा- मसाज सेंटरवर छापा टाकला होता़ या स्पाचा मालक, व्यवस्थापिका, ग्राहक व पाच तरुणींना ताब्यातही घेण्यात आले होते़ या घटनेनंतर शहरातील स्पा सेंटरची माहिती घेतल्यानंतर शुक्रवारी एकाचवेळी १९ ठिकाणी छापे टाकण्यात आले़ यामध्ये पोलिसांना केवळ ३-४ सेंटरच सुरू असल्याचे आढळून आले़ कॉलेजरोवरील एन्झी स्पा सेंटरवरील छाप्याच्या दुसऱ्या दिवसानंतर बहुतांशी स्पा सेंटर हे अचानक बंद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ त्यामुळे या सेंटरमध्ये नक्कीच देहविक्र य सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे़ या मसाज सेंटरवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे़ दरम्यान, शहरातील उच्चभ्रू परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृतपणे स्पा सेंटर सुरू असून, त्याठिकाणी ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे़ या कारवाईत गंगापूर, पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यातील महिला व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)