शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ओझर शिवारात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 19:29 IST

ओझर: येथून जवळच दिक्षी रोडवर असणाऱ्या आलसाना डेअरी फार्मच्या शेजारी असणार्या शेडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरु वारी रात्री आठ च्या दरम्यान कत्तलखाण्यात धाड टाकून गोवंश जनावरे व गोवंश जनावरांच्या जातीचे कातडी,मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमुळे ओझर शहरात एकच खळबळ उडाली आहे.गुरु वारी रात्रभर सदर कारवाई सुरू होती.

ठळक मुद्दे .चौघे ताब्यात जिवंत गोवंश,गोमांस आदी साहित्य जप्त.

ओझर: येथून जवळच दिक्षी रोडवर असणाऱ्या आलसाना डेअरी फार्मच्या शेजारी असणार्या शेडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरु वारी रात्री आठ च्या दरम्यान कत्तलखाण्यात धाड टाकून 42 गोवंश जनावरे व गोवंश जनावरांच्या जातीचे कातडी,मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमुळे ओझर शहरात एकच खळबळ उडाली आहे.गुरु वारी रात्रभर सदर कारवाई सुरू होती.यतींद्र कांतीलाल जैन रा.भिवंडी जिल्हा ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली ,या बाबत अधिक माहिती अशी की जैन यांनी फिर्याद दिल्यानंतर ओझर पोलीस फौजफाट्यासह गुरु वार दि नऊ मे रोजी रात्री आठ वाजता ओझर शिवार येथील या शेड मध्ये व शेजारील गोठ्यामध्ये बेचाळीस गोवंश जनावरे कोंबून बांधून ठेवलेले दिसले,याच ठिकाणी गोवंश जनावरांची कातडी ८७नग,व ५५ किलो हाडामांसाचे तुकडे मिळून आले याच ठिकाणी जनावरे वाहण्यासाठी असणारी पीक अप व्हॅन क्र ं एम एच १५,ई जि ८५७० ही देखील सापडलीओझर पोलिसांनी या प्रकरणी छोटू उर्फ रिफक जाफर कुरेशी रा वडाळा नाशिक,नितीन मधुकर बंदरे रा. मातंगवाडा ओझर, हुसेन हनिफ कुरेशी रा. साठेनगर वडाळा नाशिक,नजीब इकबाल मंसुरी रा. द्वारका नाशिक यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . या छाप्यामध्ये पोलीस उपअधीक्षक अरु ंधती राणे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,उपनिरीक्षक अजय कवडे व इतर पोलीस सहभागी झाले होते.आरोपींना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्या.हुरगट यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास ओझर पोलीस करीत आहे.चौकट:कुणालाही लवकर लक्षात येणार नाही अशा ठिकाणी शेतात सदर कत्तलखाना सुरू होता.सुरवातीला रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांना काहीच दिसले नाही पण काहींनी पुढे जात विरु द्ध दिशेला दरवाजा असलेल्या शेड मध्ये छापा मारला आण िमुद्देमाल हस्तगत केला.पोलिसांनी ज्या ठिकाणाहून जिवंत गायी ताब्यात घेतल्या त्यांना तातडीने पाणी चारा देत एका गाडीत टाकून पिंपळगाव येथे गोशाळेकडे सुुपूर्द करण्यात आले.उर्विरत जप्त केलेलं साहित्य ओझर पोलिसांनी गाडी सह जमा केले.फोटो:कत्तलखान्यातुन अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपीं समवेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपनिरीक्षक अजय कवडे,बाळासाहेब पानसरे व पोलीस कर्मचारी.(10ओझरकत्तलखाना)