शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या शेतकरी आठवडे बाजाराला पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:35 IST

शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार

ठळक मुद्देभरेकरी आले आडवेशासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला हरताळ  आता पोलीस बंदोबस्त

नाशिक : मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असताना स्थानिक भरेकरºयांनी गेल्या शुक्रवारी बाजारात धुडगूस घातल्याने आता शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार आहे. मखमलाबादरोडवरील पांजरापोळच्या जागेत गेल्या डिसेंबरमध्ये सुरू झोलेल्या या बाजाराला भरेकºयांकडून सातत्याने विरोध होत असल्याने बाजाराच्या भवितव्याचा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ सुरू झाला आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिसेंबर २०१७ मध्ये आठवडे बाजार सुरू करण्यात आला. पहिल्याच आठवडे बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आठवडे बाजाराची संकल्पना साकार झाल्याचे बालेले जात होते.मात्र, दुसºया आठवडे बाजारापासून भरेकºयांनी बाजाराच्या आजुबाजूला दुकाने थाटल्याने वाहतुकीची मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पांजरापोळ संस्थेने अतिक्रमण विभागाला पाचारण केले होते. त्यानंतर रस्त्यावरील बाजारातील विक्रेत्यांनी पुढच्या रस्त्यावर बाजार मांडला. गेल्या दोन आठवड्यांपासून सदर प्रकार सुरूच होता. शुक्रवार, दि. १९ रोजी तर परिसरातील भरेकºयांनी थेट शुक्रवार आठवडे बाजारात घुसून बाजार उठविण्याचा प्रयत्न केला. आठवडे बाजारातील विक्रेते हे शेतकरी नसून भरेकरी असल्याचे आरोप करीत भरेकरी बाजारात शिरले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बाजाराच्या प्रवेशद्वारावर पांजरापोळचे कर्मचारी तैनात असतात, परंतु त्यांना न जुमानता बाहेरील भरेकरी बाजारात शिरले होते.भरेकºयांनी बाजारात घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करीत काही शेतकºयांना धमकविण्याचा प्रयत्न केला तसेच काहींना कुठून आले अशी विचारणा करून परत बाजारात न येण्याची धमकी दिल्याचा अनुभव शेतकºयांनी सांगितले. शुक्रवार आठवडे बाजाराला स्थानिक भरेकºयांचा कायमच विरोध राहिला आहे. त्यांनी पहिल्या आठवडे बाजारापासूचन बाजाराच्या बाहेर बसणे, स्थानिक नागरिकांना बाजारात जाण्यापासून रोखणे, रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू केले होते. त्यामुळे पांजरापोळ आणि पणन महामंडळाला पोलिसांना पाचारण करावे लागले होते. तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्यादेखील तैनात करण्यात आल्या होत्या. एव्हढे उपाय करूनही भरेकºयांनी गोंधळ घातल्याने आता पुढील शेतकरी आठवडे बाजारात पणन महामंडळाचे कर्मचारी, पांजरापोळचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात सुरू होणार आहे.