नांदूरशिंगोटे : पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येथे पोलिसांनी पथसंचलन केले. निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, तुषार गरुड, सचिन चौधरी यांच्या उपस्थितीत गावातील विविध चौकातून पथसंचलन करण्यात आले.
येथील निमोण व वावी रस्त्यापासून रुट मार्च सुरू करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले. रुट मार्चमध्ये सिन्नर पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व १० अंमलदार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व ९ अंमलदार, वावी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व १० अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयातील एक प्लाटून, १ अधिकारी व १७ अंमलदार सहभागी झाले होते. पोळा सण व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस दूरक्षेत्रात सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या अध्यक्षतेखाली हद्दीतील गणपती मंडळ व पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली. एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याबाबत सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय नियमांचे पालन करून सर्वांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन कोते यांनी केले.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत असल्याने प्रत्येक गणेश मंडळाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सामाजिक सलोख्यात कोणतीही बाधा येणार नाही, याची काळजी सर्वच गणेशभक्तांना घेण्याचे आवाहन कोते यांनी केले. शांतता कमिटीच्या सदस्यांनी बैठकीत काही सूचना मांडल्या. यावेळी नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो -
नांदूरशिंगोटे येथे वावी पोलीस ठाण्याच्यावतीने गावातील प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.
050921\05nsk_7_05092021_13.jpg
नांदूरशिंगोटे येथे वावी पोलीस ठाण्याच्यावतीने गावातील प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.