नाशिक : लोकसभा निवडणूक निकालानंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील संवेदनशील परिसरात प्रामुख्याने भद्रकाली पोलीस ठाणे परिसरात संचलन करण्यात आले़लोकसभा निवडणुकीचा १६ मे रोजी निकाल असून, या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी चौक, नानावली, कुंभारवाडा, चौकमंडई या संवेदनशील परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक भगवान मथुरे आणि पोलीस कर्मचार्यांनी संचलन केले़ (प्रतिनिधी)फ ोटो:- १५ पीएचएमए ७३
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भद्रकालीत पोलिसांचे संचलन
By admin | Updated: May 16, 2014 00:45 IST