शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला ‘मडबाथ’चा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:22 IST

नाशिक : सुमधुर संगीत, संगीताच्या तालावर संपूर्ण अंगाला लावला जाणारा चिखल, चिखलामध्ये लोळणारी माणसे पाहून हे दुर्गम भागातून आलेत की काय असे विचारले जाणारे प्रश्न? हे दृश्य होते नाशिक-पेठरोडवरील तवली- फाट्याजवळ आयोजित आगळ्या-वेगळ्या ‘मडबाथ’ उत्सवाचे़

ठळक मुद्देसकाळी सात वाजेपासून या कार्यक्रमास सुरुवात मडबाथ कार्यक्रमाची तयारी सुमारे महिनाभर आधीपासून

नाशिक : सुमधुर संगीत, संगीताच्या तालावर संपूर्ण अंगाला लावला जाणारा चिखल, चिखलामध्ये लोळणारी माणसे पाहून हे दुर्गम भागातून आलेत की काय असे विचारले जाणारे प्रश्न? हे दृश्य होते नाशिक-पेठरोडवरील तवली- फाट्याजवळ आयोजित आगळ्या-वेगळ्या ‘मडबाथ’ उत्सवाचे़ विशेष म्हणजे अंगाला चिखल लावल्यानंतर आपल्यासोबत असलेले हे तेच का? असा प्रश्न निर्माण होऊनत्यांना ओळखणेही कठीण जात होते़ रविवारी सकाळी सात वाजेपासून या कार्यक्रमास सुरुवात झाली़ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आले होते़ अंगाला चिखल फासल्यानंतर सुमारे एक तास उन्हात चिखल सुकवायचा व त्यानंतर शॉवरखाली किंवा या ठिकाणी असलेल्या विहिरीत डुबकी मारायची़ ज्येष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल, नवलनाथ तांबे, भाजपाचे महानगर सरचिटणीस उत्तमराव उगले, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, विशाल उगले, अ‍ॅड. वैभव शेटे, राजेंद्र फड, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, अमित घुगे, डॉ. विश्वास सावकार आदींसह शेकडो नागरिकांनी या मडबाथचा आनंद लुटला़ या मडबाथ कार्यक्रमाची तयारी सुमारे महिनाभर आधीपासून केली जाते़ वारुळाची माती गोळा करायची, आठ दिवस ही माती भिजवायची आणि संपूर्ण शरीराला लावून उन्हात सुकविल्यानंतर आंघोळ करायची़ यामुळे शरीरातील उष्णता निघून जाण्याबरोबरच त्वचा चकचकीत होत असल्याचे नंदू देसाई यांनी सांगितले़