शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर 'ती' बनली पोलीस अधिकारी..!

By admin | Updated: June 8, 2016 17:34 IST

पाचवीला पूजलेला दुष्काळ उदरनिर्वाहासाठी केवळ चार एकर कोरडवाहू शेती. घरात खायची तोंडे सात. अपत्यांमध्येही मुली मोठ्या तर मुलगा सर्वात लहान. आर्थिक चणचण तर नेहमीचीच.

- विजय मोरे

नाशिक, दि. ८ - पाचवीला पूजलेला दुष्काळ उदरनिर्वाहासाठी केवळ चार एकर कोरडवाहू शेती.  घरात खायची तोंडे सात. अपत्यांमध्येही मुली मोठ्या तर मुलगा सर्वात लहान. आर्थिक चणचण तर नेहमीचीच. या विदारक परिस्थितीत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मेहनतीची कामे करून बीडच्या दुष्काळी जिल्ह्यातील मुलगी दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. यानंतर पोलीस दलातील कर्तव्य, अभ्यास व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून केवळ पोलीस उपनिरीक्षक नाही तर अकादमीतील पहिली महिला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा मान मिळविला. या महिला अधिका-याचे नाव आहे, मीना भीमसिंग तुपे.बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपूर (खामखेडा) येथील शेतकरी भीमसिंग तुपे हे पत्नी शशिकला, चार मुली अन् एक मुलगा अशा कुटुंबासह राहतात. चार एकर कोरडवाहू शेतीवर सगळ्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी़ अपत्यांमध्ये मीना सर्वात मोठी असल्याने वयाच्या अकराव्या वर्षापासूनच शेतातील नांगरणी असो, पीक कापणी, निंदणी या कामांमध्ये ती वडिलांना मदत करीत असे़, शालेय साहित्याची आबाळ असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.शेतातील कामे करून मीना तुपे यांनी डी.एड. व बी़एड.चे शिक्षण घेतले. यानंतर बीड जिल्ह्यात २०१० मध्ये झालेल्या पोलीस भरतीत पोलीस शिपाई म्हणून रुजू झाल्या. यानंतर २०१०-११ मध्ये खंडाळा येथे पोलीस प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रांमधून उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची निवड होऊन प्रथम पारितोषिक मिळाले होते. यानंतर २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. या परीक्षेतही संपूर्ण महाराष्ट्रात महिलांमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.महिला पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांचे वडील भीमसिंग हे ६५, तर आई शशिकला या ६२ वर्षांच्या आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांच्याकडून काम होत नाही. याबरोबरच तीन लहान बहिणी व भावाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. ही जबाबदारी, कर्तव्य व अभ्यास यांची सांगड घालून त्या या पदापर्यंत पोहोचल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबाबत भावुक होत जीवनातील संकटास कणखरपणे सामोरे जाणे गरजेचे असल्याचे तुपे सांगतात. शैक्षणिक कालावधीत शालेय साहित्य मिळत नसल्यामुळे आई-वडिलांबाबत राग यायचा. मात्र त्यावेळची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. या परिस्थितीनेच ध्येयप्राप्तीसाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती मला दिली. पोलीस अधिकारी म्हणून सामान्यांना न्याय देऊन देशसेवा करणार आहे. - मीना तुपे, पोलीस उपनिरीक्षक