ठळक मुद्देघरीच दुवा पठण करण्याचे आवाहन
मालेगाव: येत्या गुरुवारी साजऱ्या होणाºया शब ए बारात निमित्त पोलिसांनी शहरात संचलन केले.पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी अपर पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केले. दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रथमच सर्व पोलिसांनी तोंडाला मास्क लावून आणि हातात काठी घेतलेले पोलीस संचलनात सहभागी झाले. संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना शहरात पोलिसांसह प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. शब ए बारात निमित्त मुस्लिम बांधव कबरस्थानात पूर्वजासाठी दुवा पठण करीत असतात. यंदा प्रथमच पोलिसानी मुस्लिम बांधवांना कबरस्थानात न जाता घरीच दुवा पठण करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी संचलन करताना ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून अडविलेल्या रस्त्यातून पोलिसांनी संचलन केले