शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस यंत्रणा अपयशीच !

By admin | Updated: May 10, 2017 00:34 IST

सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़

विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे शहर पोलिसांसाठी आव्हान असून, गेल्या सव्वासहा वर्षांचा विचार करता सोनसाखळी चोरीच्या ८४0 घटनांपैकी अवघ्या २६८ गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे़ सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़ शहरातील इंदिरानगर, गंगापूर, उपनगर, पंचवटी, नाशिकरोड, म्हसरूळ या पोलीस ठाणे हद्दीत सकाळी-सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला या सोनसाखळी चोरट्यांच्या रडारवर असतात़ धूम स्टाइलने दुचाकीवर येऊन पाठीमागून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचायचे तर कधी पत्ता विचारण्याचा बहाणा अशा या क्लृप्त्या या चोरट्यांकडून वापरल्या जातात़ विशेष म्हणजे काम फत्ते झाल्यानंतर चोरटे क्षणार्धात पलायन करतात अन् पोलिसांच्या नाकाबंदीतही ते हाती लागत नाहीत़ सद्यस्थितीत लग्नसराईचे दिवस असल्याने तसेच मुलांना सुटी असल्याने महिला खरेदीसाठी बाहेर पडतात़ दुचाकीवरून येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिला वा वृद्धांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोनसाखळी चोरटे खेचून नेतात़ सोनसाखळी खेचल्यानंतर चोरट्यांना पळ काढण्यात यश येत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते़ शहरात सोनसाखळीची घटना घडत नाही, असा एखादाच दिवस जातो़ विशेष म्हणजे या सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़  सोनसाखळी चोरीतील कमी धोका, कमी श्रम, गुन्हे करण्यास सोपे, पकडले जाण्याची शक्यता कमी, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून, या घटनांमध्येही वाढ झाली आहे़ एक दुचाकी (शक्यतो चोरीची) अन् चालविण्यासाठी साथीदार, एवढेच भांडवल यासाठी पुरेसे असते. तसेच चोरलेले दागिने ठरलेल्या सराफाच्या दुकानात विक्री केले जातात, तर कमी भावात मिळणारे हे सोने सराफ ांकडून विकत घेतले जात असल्याने सहज पैसे मिळतात़ सराफाने सोने वितळून त्याची चीप बनविली की पुरावा संपला, असे या चोरट्यांना वाटते. शहर पोलीस आयुक्तालयात २०१४ पासून सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल करण्याचे प्रमाण अत्यल्प कमी आहे़ पोलिसांनी जनजागृतीबरोबरच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़