शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक साळी यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:17 IST

आगर टाकळी रस्त्यावर अपघात : सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरतलोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : आगर टाकळी रस्त्यावरील मधुबन लॉन्ससमोर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रमेश नारायण साळी (५२) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़ १९) दुपारच्या सुमारास घडली़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या ...

आगर टाकळी रस्त्यावर अपघात : सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरतलोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : आगर टाकळी रस्त्यावरील मधुबन लॉन्ससमोर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रमेश नारायण साळी (५२) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़ १९) दुपारच्या सुमारास घडली़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या विठ्ठलनगर कामटवाडा येथील रहिवासी व सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश नारायण साळी (वय ५२) हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिवा (एमएच १५ इझेड ५०४) दुचाकीवरून जेलरोड जुना सायखेडा रोड टाकळीमार्गे मधुबन लॉन्स येथून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या हिरो होंडा पॅशन (एमएच १५ सीए ११०३) वरील चालकाने साळी यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली़ साळी यांच्या नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या अपघातानंतर या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती़ सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांनी साळी यांच्या नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी मिलिंद जगताप यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री नऊ वाजेपर्यंत अपघातग्रस्त हिरो होंडा पॅशनवरील चालकाचा तपास लागलेला नव्हता.