शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पहिने पिकनिक पॉइंटवर पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:58 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.येथे पर्यटनप्रेमी व भाविक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. श्री त्र्यंबकराजाचे दर्शन व त्यातच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दीमुळे संसर्ग वाढू शकतो. या कारणावरून पहिने येथे नाशिक, त्र्यंबक, घोटी व वाडीवºहे या तीनही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.पहिने परिसरात पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी नेहमी गर्दीने ओसंडणारा परिसर निर्मनुष्य व ओस पडलेला आहे. अगदीच तुरळक फिरायला आलेले हौशी पर्यटक निसर्गप्रेमी पहायला मिळतात. पावसाने विश्रांती घेतली असून, पहिने परिसरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पेगलवाडी फाटा, पहिने-देवगाव रस्ता येथे त्र्यंबकेश्वर आणि वाडीवºहे पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पथकासह पेगलवाडी फाटा ते तोरंगण घाट या परिसरात लक्ष ठेवून आहेत.-------------मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सध्या कोरोनाकाळात पर्यटन व जिल्हाबंदी असतानाही धरणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणच्या नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी रोखताना दमछाक होत आहे. मालेगाव शहरापासून अवघ्या २५ ते २६ किलोमीटरवर असलेल्या गिरणा धरणावर सध्या शासनाच्या नियमांना व कोरोनाबंदीला हरताळ फासून नागरिक गर्दी करताना दिसतआहेत.पाच तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया या धरणावर नागरिक नेहमीच गर्दी करीत असतात. मात्र सध्या सर्वत्र कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील मालेगाव, नांदगाव, मनमाड, धुळे, चाळीसगाव, जळगाव येथील हौसी पर्यटक गिरणा धरणाकडे धाव घेत आहेत. सध्या गिरणा धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी एजन्सीला देण्यात आली आहे. दिवसा व रात्री प्रत्येकी चार कर्मचाºयांच्या भरोशावर सुरक्षा ठेवली जात आहे. शासनाच्या वतीने एक शाखा अभियंता, तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या अपुºया कर्मचारीवर्गामुळे सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक