शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

By संजय पाठक | Updated: July 19, 2022 11:26 IST

नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संजय पाठकनाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत काल झालेल्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन दिवसांपासून खासदार गोडसे हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी सद्य परिस्थितीत शिवसेनेने भाजपासोबत जावे अशी भूमिका घेतली होती त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत देखील ते सहभागी झाले होते. आपण शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे असल्याचे त्यांनी सांगितले होते व हीच भूमिका खासदार प्रतापराव जाधव यांनी बैठकीत मांडली असे गोडसे यांनी सांगितले. भाजपाशी नैसर्गिक युती करावी असे यापूर्वीही आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते असे ते म्हणाले होते.

दरम्यान त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेनंतर आता नाशिक येथील खडकाळी सिग्नल जवळील त्यांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.