नाशिक : रेशन धान्याची वाहतूक करणाऱ्या पुरवठा ठेकेदाराकडे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले नायब तहसीलदार सुधीर दामोदर सातपुते (रा़ वर्धमान रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर ८, सारडा बंगल्यासमोर, चोपडा लॉन्सच्या मागे, गंगापूररोड, नाशिक) यांना विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी (दि़ १२) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोचविण्याच्या ठेक्याची मुदत संपल्याने व पुढील महिन्याचा ठेका मिळावा यासाठी भेट घेणारा ठेकेदार व त्याच्या व्यावसायिक मित्रांकडे नायब तहसीलदार सातपुते यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ या प्रकरणी ठेकेदार व त्याच्या मित्रांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी (दि़ ११) जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला़ तहसीलदार सातपुते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चाहूल लागल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही़; मात्र लाचेची मागणी केल्याचा सबळ पुरावा मिळाल्याने त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली़ शुक्रवारी (दि़ १२) त्यांना एसीबी विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी रविवारपर्यंत (दि़ १४) पोलीस कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)
नायब तहसीलदार सातपुते यांना पोलीस कोठडी
By admin | Updated: August 12, 2016 23:16 IST