शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दारू पार्टीप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:09 IST

अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

नाशिक : अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्णातील सर्व संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र मंगळवारी (दि.१) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सर्व संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहे.पांगरमल येथे झालेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्याने नऊ लोक मृत्युमुखी, तर तेरा जणांना विषबाधा झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत गुन्ह्णात सहभागी असणाºया वीस संशयितांना अटक केली होती. यामध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे, मंगला आव्हाड माजी पंचायत समिती सभापती गोविंद मोकाटे यांच्यासह तब्बल २० संशयितांचा सहभाग आहे. भाग्यश्री मोकाटे घटनेपासून फरार असून, गोविंद व मंगला यांना जामीन मंजूर झाला आहे. सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहमदगर येथील कारागृहातून सर्व संशयितांना पोलिसांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलविले आहे. भाग्यश्री मोकाटे अद्याप फरार असून, गुन्हे अन्वेषण विभागापुढे त्यांना अटक करण्याचे आव्हान आहे.जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करत पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सर्व संशयितांना मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश दिले असून, यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.