शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणानंतर हत्त्या केल्याप्रकरणी भाजपाच्या नगरसेवकाला पोलीस कोठडी

By admin | Updated: May 27, 2017 17:08 IST

न्यायालयासमोर संशयित नगरसेवक हेमंत शेटटी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी, राकेश कोष्टी यांना प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी एम.के.पिंगळे यांनी येत्या १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

नाशिक : येथील भाजपाच्या नगरसेवकाला एका गुन्हेगाराच्या अपहरणाचा कट रचून त्याची हत्त्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयासमोर संशयित नगरसेवक हेमंत शेटटी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी, राकेश कोष्टी यांना प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी एम.के.पिंगळे यांनी येत्या १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पंचवटी पोलीस ठाण्यात १ आॅक्टोबर २०१५ रोजी जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उगलमुगलेचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी तपासामध्ये व्यक्त केला होता. संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांनी जालिंदरचे अपहरण करून त्याला राकेश कोष्टी, कुंदन परदेशी यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर उगलमुगलेचा मृतदेह सिन्नर-घोटी मार्गावर जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. कोष्टी, परदेशी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी खून, दरोडे, घरफोड्यांसह विविध गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात पंचवटी परिसरातील हनुमानवाडी-क्र ांतीनगर भागात वाघ खूनप्रकरणी तुरूंगवास भोगत होते. दरम्यान, या गुन्ह्यातही त्यांचा सहभाग आढळून आला. तसेच पोलिसांनी कौलकर व कडाळे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर गुन्ह्याची उकल होत गेली आणि अपहरणापासून तर हत्त्येपर्यंत गुन्ह्यात शेट्टी यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस पथकाने वाघाडी येथे शुक्रवारी अटक केली होती. न्यायालयासमोर पोलिसांनी संशयित कोष्टी, परदेशी व शेट्टी यांना हजर केले. न्यायालयाने येत्या १ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

भाजपात प्रवेश ठरला होता वादग्रस्तहेमंत शेट्टी यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढवून ते जिंकून आले होते; मात्र भाजपामध्ये शेट्टी यांचा प्रवेश गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे चांगलाच गाजला होता. शेट्टी हे राष्ट्रवादीमधून भाजपात आले होते.