शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोरोना योद्ध्यांच्या वारसांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:46 IST

नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून शहर-ग्रामीण पोलीस दल कोरोनाशी समोरासमोर लढा देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना कोरोनाशी सामना पोलिसांना करावा लागत आहे. शहर पोलीस आयुक्तालयाने सहा तर ग्रामीण पोलीस दलाने आतापर्यंत आपल्या सात योध्यांना गमावले आहे. आतापर्यंत एकूण १३ पैकी ७ वारसदारांना शासनाच्या ५० लाख रु पयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देमदतीचा हात : ७ कुटुंबीयांना मिळाला विम्याचा लाभ

नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून शहर-ग्रामीण पोलीस दल कोरोनाशी समोरासमोर लढा देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना कोरोनाशी सामना पोलिसांना करावा लागत आहे. शहर पोलीस आयुक्तालयाने सहा तर ग्रामीण पोलीस दलाने आतापर्यंत आपल्या सात योध्यांना गमावले आहे. आतापर्यंत एकूण १३ पैकी ७ वारसदारांना शासनाच्या ५० लाख रु पयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे.कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांकडून सर्वतोपरी सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. नुकतेच शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कोविड केअर सेंटरदेखील सुरु करण्यात आले आहे, जेणेकरून पोलिसांना वेळेवर आणि चांगल्याप्रकारे वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल. दरम्यान शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. तसेच ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. असे एकूण जिल्ह्यात तेरा पोलीस कर्मचाºयांचा आतापर्यंत बळी गेला आहे. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडणाºया आरोग्य, पोलीस दलातील योद्ध्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांच्या विम्याचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील आतापर्यंत तिघा योद्ध्यांच्या वारसांना विम्याची रक्कम मिळाली असून चौथा प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आला असून लवकरच त्यांची रक्कम आयुक्तालायकडे प्राप्त होणार आहे. उर्वरित दोन प्रस्तावांवर आतापर्यंत स्वाक्षरी झालेली नाहीत. तसेच अलीकडे निधन झालेल्या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. तसेच ग्रामीण पोलीस दलातील एकूण ७ पोलीस कर्मचाºयांपैकी ४ वारसदारांना विम्याचा रकमेचा लाभ झाला असून उर्विरत तीन प्रस्ताव मंजुरीकरिता ठेवण्यात आले आहेत.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल