शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गंगापूररोडवरील पोलीस वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वसाहतीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, थंडीताप, सांधेदुखी, सर्दी, घसादुखीचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे वसाहतीतील अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात डेंग्यू आजारावर उपचार घेत असून, लहान मुलांपासून ते कर्मचाºयांपर्यंत अनेकांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गंगापूररोडवरील पोलीस वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वसाहतीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, थंडीताप, सांधेदुखी, सर्दी, घसादुखीचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे वसाहतीतील अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात डेंग्यू आजारावर उपचार घेत असून, लहान मुलांपासून ते कर्मचाºयांपर्यंत अनेकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.पोलीस वसाहतीत गेल्या पंधरवड्यापासून चार ते पाच नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने काहींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेली असल्याने या भागात मनपा प्रशासन तसेच संबंधित प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे असले तरी अद्यापपावेतो कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. प्रभागाच्या नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप पोलीस कुटुंबीयांनी केला आहे.पोलीस वसाहतीत शेकडो पोलीस कर्मचारी राहात आहेत. परिसरात दैनंदिन साफसफाई होत नाहीच याशिवाय मोकाट जनावरांचा संचार वाढलेला आहे. परिसरातील काही घरांचे व इमारतींचे ड्रेनेज चोकअप झाल्याने सांडपाणी साचून राहते, त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याशिवाय परिसरात गाजरगवत वाढलेले असल्याने औषध फवारणीदेखील होत नसल्याची तक्रार पोलीस कर्मचाºयांनी केली आहे. नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीस कुटुंबीयच सध्या डेंग्यूसदृश आजाराच्या विळख्यात सापडल्याने त्यांची सुरक्षा करणार कोण, असा सवाल खुद्द पोलीस कर्मचाºयांनी केला आहे.वसाहतीच्या मागील बाजूस प्रचंड घाण साचलेली आहे तर मोकळ्या जागांवर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. संपूर्ण वसाहतीत डुकरांचा उपद्रव वाढला आहे. पोलीस वसाहत इमारतीच्या मागील बाजूस कचराकुंडी झालेली आहे तर पिण्याच्या पाण्याच्या नळाजवळच दुर्गंधीयुक्त डबके आणि घाणीचे साम्राज्य आहे. पोलीस कर्मचाºयांनी स्वत: अनेकदा तक्रार केलेली आहे. मात्र पोलीस प्रशासनच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.