शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार जया दिवेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By admin | Updated: July 14, 2017 01:21 IST

पंचवटी : सुनील वाघ व हेमंत वाघ भावंडांवर हल्ला करत खुनामध्ये सहभाग गुन्ह्यात जया दिवे मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : हनुमानवाडीमधील भेळविक्री करणाऱ्या सुनील वाघ व हेमंत वाघ या दोघा सख्ख्या भावंडांवर हल्ला करत सुनील वाघ यांची हत्या तसेच दिंडोरीरोडवरील रहिवासी मंगेश पाटील या विक्रे त्याच्या खुनामध्ये सहभाग व गोळीबार, मोक्का आदिंसह विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला जया दिवे ऊर्फ जेडीच्या अखेर मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.मालेगाव स्टँड परिसरात गुरुवारी (दि.१३) दुपारी दिवे येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे परिसरात सकाळपासूनच गुन्हे शोध पथकाचे साध्या वेशातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिवे हा मालेगाव स्टँडवर असलेल्या सिद्धी टॉवरच्या इमारतीमध्ये असल्याचे समजताच पोलिसांनी इमारतीला वेढा दिला. दिवे निसटून जाऊ नये, याची पूर्ण तजवीज पोलिसांनी केली. पोलिसांनी शिताफीने दिवेला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.दिवेकडून विविध गुन्हे उघडकीस येणार असून, फरार गुन्हेगारांची माहिती उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दिवे याने आतापर्यंत चार खून केले असून, परिसरात गोळीबार करून दहशत पसरविणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला, खंडणी वसुली, असे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोलिसांना तो हवा होता. त्याच्या मागावर तसेच गुप्त बातमीदारांमार्फत सातत्याने पोलीस चाचपणी करत होते.