शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस सतर्क : कारागृहातून शिजतोय अ‍ॅड.अजय मिसर यांच्या हल्ल्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:42 IST

त्यांच्याकडे मोक्काचे १२ खटल्यांचे कामकाज आहे. यामध्ये काही खटले अत्यंत गंभीर व देशविघातक कृत्यांमध्ये सक्रिय असणा-या टोळींशी संबंधित आहे.

ठळक मुद्देएका न्यायालयीन बंदीने सूचना पेटीत टाकलेल्या पत्रावरून खुलासा सिंगल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली

नाशिक : जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्यावर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामधील मोक्काची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींच्या टोळीकडून हल्ल्याचा कट शिजविला जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका न्यायालयीन बंदीने सूचना पेटीत टाकलेल्या पत्रावरून झाला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, मिसर हे सरकारी वकील असून, त्यांच्याकडे मोक्काचे १२ खटल्यांचे कामकाज आहे. यामध्ये काही खटले अत्यंत गंभीर व देशविघातक कृत्यांमध्ये सक्रिय असणा-या टोळींशी संबंधित आहे. मध्यवर्ती कारागृहातील एका बॅरेकमध्ये मोक्काअंतर्गत शिक्षा भोगणा-या सुमारे ७० ते ८० बंदींपैकी एका न्यायालयीन बंदीने कारागृहात प्रवेश करणा-या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारालगत भिंतीवर लावण्यात आलेल्या बंदींच्या सूचना पेटीत मिसर यांच्या जिवाला धोका असून, कारागृहातील याच बॅरेकमधून त्यांचा ‘गेम’ करण्याचा कट शिजविला जात असल्याचे म्हटले आहे. मोक्काची शिक्षा झालेल्या आरोपींचे साथीदार जे मोकाट आहे, ते मिसर यांच्या जिवाला धोका पोहचवू शकतात, असा त्या बंदीच्या पत्रात नमूदकरण्यात आले आहे. सोमवारी (दि.२) तुरुंगाधिका-यांनी साप्ताहिक फेरीदरम्यान सूचना पेटी तपासली असता अशा आशयाचे पत्र आढलळून आले. हे पत्र पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे पाठविले असून, दुसरी प्रत मिसर यांना रवाना केली आहे. सिंगल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर या पत्रातील मजकुरामध्ये काही सत्यता आहे की नाही, याचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, नुकतेच राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे शहराच्या दौ-यावर होते. त्यांच्याही सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत त्वरित तपास करून संशयितांच्या मुसक्या बांधण्याचे आदेश सिंगल यांना दिल्याचे समजते. यापूर्वीदेखील मिसर यांना अशाप्रकारे धमकावण्यात आले आहे. वारंवार त्यांना येणा-या धमक्यांमागे नेमके कोण आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नसून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय