शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मालेगावी रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य

By admin | Updated: September 20, 2015 22:47 IST

मालेगावी रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य

मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरात गणेशोत्सवकाळात शहराच्या मुख्य रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून, मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नसल्याने गणेशभक्तंमध्ये संताप व्यक्त होत आहे.मालेगावी गणेशोत्सव सुरू होण्याआधी शहरवासीयात उत्साहाचे वातावरण होते. गणेशोत्सव काळात महापालिकेने साफसफाई मोहीम, पावडर फवारणी, तसेच मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे आदि कामे करणे अपेक्षित होते; मात्र यंदा या कामांकडे महानगरपालिकेने सर्रास दुर्लक्ष केले आहे. गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी व नंतर चार दिवस उलटले तरी प्रशासन सुस्त आहे. शहरातील मुख्य रस्ता जुना आग्रारोड, कॅम्प रस्ता, सटाणारोड, संगमेश्‍वर, किदवाई रस्ता, नवीन बसस्थानक मार्ग, सटाणानाका. शहरातील मध्य भाग, पाच कंदील, गूळबाजारासह असंख्य रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रामुख्याने आग्रारोड, कॅम्परोड, सटाणा रोड, सटाणानाका मोसम पूल चौक येथील रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमुळे नियमित वाहतुकीत लहानमोठय़ा वाहनांना अडचणी येत आहेत. लहान मोठे अपघात होत असून आहे. वाद विवाद होत आहेत. त्यामुळे प्रसंगी वाहनांचे मोठे नुकसानही होत आहे. याच गणेशोत्सव कालावधीत हे रस्ते दुरुस्त करण्याचे धारिष्ठ अधिकार्‍यांनी दाखवले नाही, तर गणेश मिरवणुकीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधितांनी वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)