शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे मिळाली लष्करी जवानाची बॅग परत़़...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 22:31 IST

नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा आठ दिवसांत यशस्वी तपास करणाºया इंदिरानगरमधील पोलीस कर्मचाºयांना पोलीस आयुक्तांनी रिवॉर्ड घोषित ...

नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा आठ दिवसांत यशस्वी तपास करणाºया इंदिरानगरमधील पोलीस कर्मचाºयांना पोलीस आयुक्तांनी रिवॉर्ड घोषित केले आहे़पाथर्डी फाट्यावरील ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी व लष्करी जवान योगेश बाबूराव पाटील यांनी ३ आॅगस्ट २०१७ रोजी त्र्यंबकनाका ते ज्ञानेश्वरनगर असा रिक्षाने प्रवास केला़ घरी परतल्यानंतर दोनपैकी एक बॅग रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले़ या बॅगमध्ये फ्लॅट घेण्यासाठी जमविलेले ४ लाख ६० हजार रुपये, ओळखपत्र व महत्त्वाची कागदपत्रे होती़; मात्र पाटील यांनी रिक्षा नंबरही पाहिला नसल्याने त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली़इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत रिक्षाचालकाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले़ त्यानुसार उपनिरीक्षक बोडके, हवालदार जाधव, टोपले, शेख, खांडबहाले, पाटील यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचा तसेच रिक्षा स्टॅण्डवरील माहितीचा आधार घेऊन तपास सुरू केला़ सिडकोतील विजयनगर येथे राहणारा अनिल दगडू राठोड (३०, मूळ रा. चंडिकावाडी, जळगाव) याची रिक्षा असल्याचे तपासात समोर येताच त्याच्या मूळगावी जाऊन या पथकाने रोकड व बॅग हस्तगत केली़लष्करी जवानाची रिक्षात विसरलेली बॅग नंबर माहिती नसताना परिश्रम करून पुन्हा मिळवून देणाºया पोलीस कर्मचाºयांचा पोलीस आयुक्तांनी सत्कार करून रिवॉर्ड घोषित केले आहे़