शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

‘पॉस’ने धान्य न देणाऱ्या दुकानांची होणार झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:36 IST

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण्याचे जाणून घेण्याबरोबरच त्याची खात्री करण्यासाठी त्या त्या शिधापत्रिकाधारकांकडेही जाऊन पथकामार्फत विचारपूस केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ...

ठळक मुद्देराज्यात एकाच वेळी मोहीम कार्डधारकांनाही विचारपूस

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण्याचे जाणून घेण्याबरोबरच त्याची खात्री करण्यासाठी त्या त्या शिधापत्रिकाधारकांकडेही जाऊन पथकामार्फत विचारपूस केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी शहर धान्य वितरण अधिकाºयांनी दुकानदारांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याचे वृत्तआहे.राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये रेशनमधील धान्याचे वितरण ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने केले जात असून, या प्रणालीच्या वापरामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत येणारे खरे पात्र लाभार्थी समोर येण्यास तर बोगस शिधापत्रिकाधारक ओळखण्यास मदत झाल्याचा सरकारचा दावा आहे. दरमहा पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य वितरण करीत असताना साधारणत: २० ते २५ टक्के धान्याचे वाटप होत नसल्याने सदरचे धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहत आहे. परिणामी दरमहा धान्य उचलताना दुकानदारांकडून कमी मागणी नोंदविली जात आहे.सरकारने दरमहा शिल्लक राहणाºया धान्याचे वाटप करण्यासाठी नवीन लाभार्थ्यांचा शोध घेण्याची कार्यवाहीही सुरू केली आहे. तथापि, सहा महिने उलटूनही ‘पॉस’च्या माध्यमातून जेमतेत २५ टक्केच धान्य वितरण करणाºया दुकानदारांच्या अडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘पॉस’ यंत्राचा कमी वापर करणाºया दुकानदारांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकाºयांकडे आॅनलाइन सर्वच रेशन दुकानदारांचा डाटा उपलब्ध असल्यामुळे त्यातून ‘पॉस’चा कमी वापर करणाºयांचा शोध घेऊन नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. हे करताना दुकानदाराकडून ‘पॉस’यंत्राचा वापर न करण्यामागच्या कारणे जाणून घेतली जाणार आहेत.दुकानदारांनी यापूर्वीही ‘पॉस’ यंत्राबाबत येणाºया अडचणी वेळोवळी पुरवठा विभागाच्या कानावर घातल्या असल्या तरी, थेट दुकानात जाऊनच यंत्राची तपासणी करण्याबरोबरच दुकानदार देत असलेल्या कारणांची खातरजमा करण्यासाठी त्याच्या कार्यक्षेत्रातील कार्डधारकांकडेही विचारपूस करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय