शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 15:54 IST

घोटी  : आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता आभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने कवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन कवी मनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना व महीला ठीणगी आक्रमक, इगतपुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा.

घोटी  : आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता आभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने कवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन कवी मनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.माथेफिरू कवी दिनकर मनवर याने अत्यंत अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून, मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता श्रमजीवी संघटना व महीला ठीणगी आक्रमक झाली आहे. या माथेफिरू कवी दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी श्रमजीवी महिला ठिणगीच्या कार्यकर्त्या मुंबई विद्यापीठात धडकणार आहेत.मुंबई विद्यापीठाच्या बीए तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात पाणी कसं अस्तं या शिर्षकाखाली प्रकाशित केलेल्या कवितेत आदिवासी मुलींची मानहानी करणारे, विनयभंग करणारे वर्णन आहे. या कवितेमुळे समाजात विशेषतः महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगीच्या कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून आता याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. .सोमवारी महिला ठिणगीच्या महिला आणि युवती मुंबई विद्यापीठात धडक देणार असून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी श्रमजीवी महिला ठिणगीच्या वतीने करण्यात आली. मोर्चानंतर सर्व महिला युवतीनी इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन कवी दिनकर मनवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मोर्चात श्रमजीवी संघटनेचे जिल्हाउपप्रमुख तुकाराम लचके जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, जिल्हा महीला ठीणगी प्रमुख सुरेखा मधे, तालुका प्रमुख संजय शिंदे, तालुका सचिव शांताराम भगत, महीला ठीणगी प्रमुख लता मेंगाळ, निता गावंडा, तुकाराम मोडके, संतोष ठोंबरे, बारकु वारे, तानाजी शिद, रामदास भगत, विजय मेंगाळ, सुनिल लोहरे यशवंत पारधी, तानाजी कुंदे यांच्यासह आदीवासी बांधवांनी सहभाग घेतला.