शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कवयित्रींचे काव्यसंमेलन रंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:10 IST

‘आम्ही लेखिका’ या संस्थेच्या वतीने आयोजित काव्यसंमेलन सामाजिक वास्तव, जीवनातील सुख-दु:ख आणि शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती यावर भाष्य करणाऱ्या विविध कविता नवोदित आणि प्रसिद्ध कवयित्रींनी सादर केल्या. या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ‘श्वास मोकळा घेते’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

नाशिक : ‘आम्ही लेखिका’ या संस्थेच्या वतीने आयोजित काव्यसंमेलन सामाजिक वास्तव, जीवनातील सुख-दु:ख आणि शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती यावर भाष्य करणाऱ्या विविध कविता नवोदित आणि प्रसिद्ध कवयित्रींनी सादर केल्या. या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ‘श्वास मोकळा घेते’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.कृषिनगर येथील श्रीसंत ज्ञानेश्वर वाचनालयात रविवारी (दि.२२) ‘आम्ही लेखिका’ या ग्रुपच्या वतीने काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका प्रा. डॉ. वेदश्री थिगळे उपस्थित होत्या. व्यासपीठावर अ‍ॅड. मिलन खोहर, प्रा. प्रीती गायकवाड आदी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री डॉ. कविता बोंडे होते. याप्रसंगी कवयित्री अलका कुलकर्णी व प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांनी संपादित केलेल्या ‘श्वास मोकळा घेते’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ज्योत्स्ना पाटील लिखित अंतरंग सुगरणींची, खवय्येगिरी सर्वांची या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच ज्येष्ठ कवयित्री प्रा. सुमती पवार यांच्या सुमतीचे श्लोक भाग-२ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. थिगळे यांनी आपल्या भाषणात स्त्री जीवनातील वास्तव परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रहातील कवितांचे कौतुक केले. सूत्रसंचालन रंजना बोरा, आरती डिंगोरी यांनी केले. परिचय स्वाती पाचपांडे यांनी करून दिला.दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सुमती पवार होत्या. यात अनेक कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या.यांचा झाला सत्कारकविसंमेलनात कवयित्री सुमती पवार, डॉ. प्रतिभा जाधव, सुमती टापसे, वैशाली शिंदे, अलका कुलकर्णी, संयुक्ता कुलकर्णी, सीमा आडकर यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक