शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बे बे बकरी... नाटकातून देशाच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:47 IST

राजकीय पुढाऱ्यांकडून भोळ्याभाबड्या ग्रामीण जनतेची दिशाभूल करून धर्म अन् श्रद्धेचा बाजार मांडत भावनांशी खेळ करत कशाप्रकारे फसवणूक केली जाते आणि त्यास ‘खाकी’ची कशी साथ लाभते, यावर रंगमंचावरून सध्याच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य करण्यात आले.

राज्य नाट्य स्पर्धा

नाशिक : राजकीय पुढाऱ्यांकडून भोळ्याभाबड्या ग्रामीण जनतेची दिशाभूल करून धर्म अन् श्रद्धेचा बाजार मांडत भावनांशी खेळ करत कशाप्रकारे फसवणूक केली जाते आणि त्यास ‘खाकी’ची कशी साथ लाभते, यावर रंगमंचावरून सध्याच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य करण्यात आले.परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या ५८व्या राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (दि. २८) संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची निर्मिती असलेल्या ‘बे बे बकरी’ हा प्रयोग सादर करण्यात आला. राजकीय शक्तीचा वापर करत ग्रामीण जनतेच्या धार्मिक भावना व अंधश्रध्देचा फायदा उचलून ‘अर्थ’कारण करण्याचा प्रयत्न होतो. गावामधील एका गरीब महिलेची पांढºया रंगाची शेळी पळवून आणली जाते आणि ती शेळी त्या महिलेची नसून चक्क बापूंची असल्याचे सांगितले जाते. त्यास स्वातंत्र्यामधील त्याग, समर्पणाची जोड देत शेळीच्या पूजापाठातूनच गाव समृध्द होईल, असे चित्र भोळ्याभाबड्या गावकºयांपुढे रंगविण्याचा प्रयत्न गावातील सालदार, हवालदार, धर्मगुरूंकडून केला जातो.मध्यंतरापूर्वीच या गावात ‘बापूंच्या शेळी’चे मंदिर उभारले जाते. मध्यंतरानंतर निवडणुका जिंकून सत्ता काबीज केली जाते. यासाठी वापर केला जातो तो म्हणजे बापूंच्या ‘शेळीचा’ असे या प्रयोगाचे कथानक फिरत जाते. त्यानंतर हा भपंकपणा एक जागरूक तरुण हाणून पाडण्याचा प्रयत्न करत गावकºयांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात करतो; मात्र राजकीय शक्ती आणि दबावापुढे तो अपयशी ठरतो. याउलट त्याला ‘नक्षलवादी’ ठरवून तुरुंगात डांबले जाते.दिलीप जगताप लिखित, रवींद्र कटारे दिग्दर्शित या प्रयोगात दिलीप काळे, भूषण गायकवाड, गणेश गायकवाड, समाधान मुर्तडक, अर्चना कडाळे, विकास जुवेकर, आश्विनी सूर्यवंशी, स्नेहा सूर्यवंशी, आकाश कंकाळ, अनुप ताकटे आदींनी भूमिका साकारल्या. नेपथ्य संदीप गायकवाड यांचे तर रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा सचिन चव्हाण आणि प्रकाशयोजना रवि रहाणे यांचीहोती. आजचे नाटक : बिघडलेली नाती,  वेळ : सायंकाळी ७ वाजता

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक