नाशिक : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ट्रान्सफार्मर बसविणे आणि पाइपलाइनच्या गळती दुरुस्तीची कामे बुधवारी हाती घेतली; परंतु गुरुवारी सकाळपर्यंत काम सुरूच राहिल्याने निम्म्या नाशकात म्हणजे सिडको व सातपूर भागासह पश्चिम व पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, दुरुस्तीची कामे लांबल्याने महापालिकेकडून पाणीकपातीची अंमलबजावणी आता शुक्रवार (दि.९) पासून होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ट्रान्सफार्मर बसविणे, तसेच पाणीगळती थांबविण्यासाठी दुरुस्तीची कामे बुधवारी काढली होती. त्यासाठी बुधवारी १२ तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र, काही वाढीव दुरुस्त्यांमुळे कामाचा कालावधीही वाढला. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राजवळील पाइपलाइनवर मीटर बसविणे, तसेच अन्य दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी १० वाजता आटोपले.
पाइपलाइनच्या गळती दुरुस्तीची कामे
By admin | Updated: October 9, 2015 00:13 IST