शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

एनडीसीएवर ‘खेळाडू’चा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:30 IST

जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खेळाडू पॅनलने अध्यक्ष व सचिव पदासह सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे

नाशिक : जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खेळाडू पॅनलने अध्यक्ष व सचिव पदासह सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे. यानिवडणुकीत एनडीसीएच्या अध्यक्षपदासाठी धनपाल ऊर्फ विनोद शाह यांनी बलविंदर सिंग लांबा यांचा एक हजार ११ मतांनी परावभव केला, तर सचिव पदासाठी समीर रकटे यांनी प्रमोद गोरे यांचा एक हजार एक मतांनी पराभव करून परिवर्तन पॅनलचा दारून पराभव केला.  जिल्हा क्रिकेटचा केंद्रबिंदू आणि सर्व क्रीडा संघटनांमध्ये मानाचे स्थान असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २०१८-२०२१ या कालावधीसाठी अध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार पदासह दहा कार्यकारिणी सदस्यांसाठी शनिवारी (दि. २८) तूपसाखरे लॉन्स येथे मतदान झाले. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम)च्या साह्याने घेण्यात आल्याने निवडणुकीनंतर अवघ्या तासभरातच निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला असून, पुन्हा एकदा सत्ताधारी खेळाडू पॅनलने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर आपला झेंडा फडकवला आहे. खेळाडू पॅनलविरोधात परिवर्तन पॅनल मैदानात उतरल्याने यावर्षी निवडणूक रंगतदार बनली होती. दोन्ही पॅनलकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे नाशिक जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंसह सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. या निवडणुकीत दोन हजार ४८९ सदस्यांपैकी एक हजार ४५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील बहुतेक मतदारांनी सत्ताधारी खेळाडू पॅनललाच पसंती दिल्यामुळे परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानुसार सत्ताधारी खेळाडू पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवत एकहाती बाजी मारली. त्यामुळे खेळाडू पॅनलचे उमेदवार आणि समर्थकांनी निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.जिल्ह्यात क्रिकेटच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रृती एनडीसीए निवडणुकीच्या मिळाली. याच कामामुळे सभासदांचा आमच्यावर विश्वास असून, या निवडणुकीच्या माध्यमातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता आम्ही जिल्ह्यात क्रिकेट खेळाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहोत.- धनपाल (विनोद) शहा, नवनिर्वाचित अध्यक्षनिवडणुकीच्या तयारीसाठी केवळ चार दिवस मिळाले, मतदार यादीमध्ये मतदारांचे संपर्काची माहितीही पुरेशी नसल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान होते. तरीही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. ही सुरुवात असून, पुढील तयारीला आतापासूनच सुरुवात करणार असून, पुढच्या वेळी चित्र निश्चित बदललेले दिसेल.- बलविंदरसिंग लांबा,  परिवर्तन पॅनल

टॅग्स :Cricketक्रिकेट