शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पाथर्डी फाटा परिसरात दुधात आढळले प्लॅस्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:49 IST

पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

सिडको : पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.येथील आनंदनगरमधील द्वारकेश सोसायटीमधील रहिवासी रामाआधार रामशिस सिंग यांनी रविवारी (दि.२३) रोजी सायंकाळी आनंदनगर पोलीस चौकीसमोरील एका स्वीट्स दुकानाच्या बाहेर व्यवसाय करणाºया दूधविक्रेत्याकडून नेहमीप्रमाणे दूध खरेदी केले. दरम्यान, सोमवारी (दि.२४) सकाळी दूध गॅसवर तापायला ठेवले असता त्यातून वेगळाच गंध येऊ लागला व दुधामध्ये गाठी तयार होऊ लागल्याने त्यांना धक्काच बसला. दरम्यान, या दुधाच्या गाठी या प्लॅस्टिकसदृश दिसू लागल्या व रबरासारख्या ताणल्या जाऊ लागल्याने दूध भेसळ केली गेल्याचा त्यांचा संशय बळावला. सिंग यांनी याबाबत नगरसेवक राकेश दोंदे यांना कळविले. यानंतर या ठिकाणी अन्न व भेसळ प्रतिबंध विभागाचे अधिकारी दाखल झाले त्यांची दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूमध्ये भेसळ करून विक्रीचा प्रकार हा गंभीर असून, याप्रकरणी अन्न व औषध तपासणी विभागात व स्थानिक पोलीस ठाण्यात तक्र ार करणार असल्याचे दोंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागmilkदूध