शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:27 IST

मालेगाव : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग लागून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या सहाय्याने आठ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली.

मालेगाव : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग लागून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या सहाय्याने आठ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली.इरफानखान नसीमखान यांच्या मालकीचे मोकळ्या भूखंडावर प्लॅस्टिकचे गुदाम आहे. शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास या गुदामाला आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार, शकील अहमद, मनोहर तिसगे, सुधाकर अहिरे, मोहन बैरागी, रवींद्र महाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीचे भीषण स्वरूप होते. आगीचे लोळ व धुरामुळे परिसरात धावपळ उडाली होती. नागरी वस्तीपासून जवळच असलेल्या या गोदामामुळे भीती व्यक्त करण्यात येत होती.मोकळ्या भूखंडांवर अनधिकृतपणे गुदामांना परवानगीच कशी दिली जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुदाम मालकांना नोटिसा बजावूनही गोदामे हटविली जात नाही. शहरात प्लॅस्टिकबंदी असताना प्लॅस्टिक येतेच कसे, असा सवाल निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाने तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. याप्रकरणी आगीची नोंद घेण्यात आली आहे.