कृष्णगाव तालुका दिंडोरी येथील बांधकाम व्यावसायिक काशीनाथ सुखदेव पवार व ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव रुंजा (आप्पा) पवार यांचे आकस्मित निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु दुःखावर मात करत कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत दिवंगत रुंजा (आप्पा) पवार यांच्या जलदान विधीनिमित्त स्मशानभूमी, प्राथमिक शाळा व गावातील आमराईत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्मशानभूमीत पिंपळ व कडुलिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली. खंडोबा मंदिर परिसरातील आमराईत आंबा रोपांची लागवड करण्यात आली, तर जिल्हा परिषद शाळेत सिल्वर ओक, पिंपळ व नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. ४७ वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याची जबाबदारी पवार कुटुंबीयांनी घेतली आहे.
फोटो- २९ कृष्णगाव
290721\29nsk_15_29072021_13.jpg
फोटो- २९ कृष्णगाव