देशमाने : मुखेड-फाटा ते जऊळके रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा लेखी-तोंडी मागणी करूनही दखल न घेतल्याने बुधवारी (दि.३) संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्यात वृक्षारोपण केले.मुखेड फाटा येथून जऊळके, पिंपळगांव (लेप), पाटोदा तसेच मनमाड येथे जाण्यासाठी कमी अंतराचा मुख्य मार्ग असल्याने या रस्तावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरून वाळूची चोरटी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्यावर मोठमोठी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांना या खड्यांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदरचे खड्डे बुजवावेत म्हणून लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचाय समितीकडे वेळोवेळी लेखी-तोंडी पाठ पुरावा केला मात्र त्याची कोणतीही दखल न घेतल्याने काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, तालुका सरचिटणीस नवनाथ भोसले, यांचेसह रतन दाते, सुनील पवार, भास्कर शिंदे, शरद आव्हाटे, गणपत पवार, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गणपत जाधव, आबा भोसले, नारायण आव्हाटे, अशोक क्षीरसागर, संदीप गायकवाड, मुन्ना चव्हाणके, देविदास दरगुडे, संदीप दाते, नवनाथ तांबे तसेच ग्रामस्थ आदींनी रस्यावरील खड्यात वृक्षारोपण करीत आपला संताप व्यक्त करीत संबंधीतांचे लक्ष वेधले.
मुखेड-फाटा, जऊळके रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:11 IST
देशमाने : मुखेड-फाटा ते जऊळके रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा लेखी-तोंडी मागणी करूनही दखल न घेतल्याने बुधवारी (दि.३) संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्यात वृक्षारोपण केले.
मुखेड-फाटा, जऊळके रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण
ठळक मुद्देखड्यात वृक्षारोपण करीत आपला संताप व्यक्त करीत संबंधीतांचे लक्ष वेधले.