शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठक

By admin | Updated: July 10, 2017 00:12 IST

दिंडोरी : ९ आॅगस्टला मुंबई येथे मराठा क्र ांती मोर्चा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : ९ आॅगस्टला मुंबई येथे मराठा क्र ांती मोर्चा होणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी दिंडोरी तालुक्यातून रणशिंग फुंकण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गनिमी काव्याने या मूक मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्याचा इरादा सकल मराठा समाजाने व्यक्त केला.दिंडोरी येथील कै. पोपटराव जाधव संकुल येथे सकल मराठा क्र ांती मोर्चाची मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सीमा हिरे, छावाचे करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर, तुषार जगताप, योगेश नाटकर, डॉ. अमोल वाजे, योगेश निसाळ आदींनी मार्गदर्शन करत मुंबई मोर्चाबाबत नियोजन केले.नाशिक येथे झालेल्या मोर्चात दिंडोरी तालुक्याची महत्त्वाची भूमिका राहिली होती. आता मुंबई मोर्चातही दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, अशी ग्वाही देण्यात आली. दिंडोरी तालुक्याच्या प्रत्येक गावात मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार असून, हा मोर्चा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी असणार आहे. या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व समाजाने एकत्रित यावे. मोर्चा आदर्शवत व्हावा यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.बैठकीचे नियोजन सोमनाथ जाधव, रवि जाधव, गंगाधर निखाडे, कवी संदीप जगताप, सुजित मुरकुटे, रावसाहेब बोरस्ते, मनोज ढिकले, नितीन देशमुख, प्रशांत मोगल, विलास लोखंडे, संतोष आंबेकर, रमेश बोरस्ते, ऋषिकेश पडोळ, गोविंद मालसाने, संतोष मुरकुटे, माधव पाचोरकर, योगेश बर्डे, नीलेश पेलमहाले, वाल्मीक मोगल आदींनी केले होते. बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .