शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम कामगारांचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे घरकाम करणाऱ्या कामगारांचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेक घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद ...

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे घरकाम करणाऱ्या कामगारांचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेक घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद होत असल्याने स्वयंपाक, धुणीभांडी करणाऱ्या महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अशा कामगारांना काम असले तरी सोसायट्यांमध्ये प्रवेश बंद करण्यात येत असल्याने कामगारांची अडचणी होत आहे.

--

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नाशिक : कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावा, असे विविध माध्यमांद्वारे सांगितले जात असले तरी काही नागरिक अजूनही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मास्कची सक्ती असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर करवाई करण्याची मागणी कोरोनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

--

मोकाट जनावरांची केविलवानी स्थिती

नाशिक : वाढत्या कोरोनामुळे शहर परिसरात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना खाद्य पदार्थ मिळत नसल्याने त्यांची केविलवानी स्थिती झाली आहे.

--

निर्बंधांमुळे माठविक्रेत्यांचा व्यावसायही ठप्प

नाशिक : शहरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. परंतु दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येणारे माठ विक्रेते यावर्षी अद्याप दिसत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केल्याने माठविक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झाला असून त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

--

जनजीवन पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात निर्बंध लागू केल्याने अनेकांचा उद्योग व्यवसाय प्रभावित झाला आहे. त्यामुळे लघू व मध्यम मोठ्या व्यावसायिकांससमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तसेच भाडेकराराने राहणाऱ्या नागरिकांसोबतच अनेक घरमालकही अडचणीत आले आहेत. या सर्वांना जनजीवन पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा आहे.

--

वीजदेयके ऑनलाइन भरण्याचे आवाहन

नाशिक : कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये आणि वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी ग्राहकांना वीजबिलाची देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वीजबिल आकरणीसाठी ग्राहकांना वीजमीटरचा फोटो काढून पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

--

रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य

नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्रीश्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्याची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

--

द्वारका भुयारीमार्ग वापराकडे पादचाऱ्यांची पाठ

नाशिक : काेट्यवधी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या वापराकडे पादचाऱ्यांकडून पाठ फिरविण्यात येत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण करूनही हा भुयारी मार्ग अजूनही बंदच आहे. पादचारी रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतरही याभागात वाहतूक कोंडी होत आहे.

--

ऑनलाइन सातबारा मिळविण्यात अडचण

नाशिक : भूमिअभिलेख संकेतस्थळावर शासनाने ऑनलाइन सातबारा सेवा चालू केली आहे. परंतु संथगतीने चालणारे इंटरनेट तसेच , इंटरनेटद्वारे सातबारा ऑनलाइन पद्धतीने मिळविण्याची माहिती नसल्याने सर्वसामान्य शेतकरीवर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या स्थितीत ऑफलाइन उतारे मिळविणे अडचणीचे ठरत असताना ऑनलाइन पद्धतीनेही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे.