शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

नियोजन समितीत भाजपाला चार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:10 IST

शिवसेना दोन, तर राकॉँला एक जागा नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळवण्यात यश आले.

शिवसेना दोन, तर राकॉँला एक जागानाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळवण्यात यश आले. सात जागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुक मतदानाचा निकाल सोमवारी (दि.१८) जाहीर झाला. यात मुख्य नागरी गट तथा महापालिका गटातील सहा जागांमध्ये नाशिक आणि मालेगावने प्रत्येकी तीन जागा मिळवत बरोबरी साधली, तर संक्र मणकालीन गटातील (नगरपंचायत) एका जागेसाठी निफाड येथील भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार विजयी झाले.नियोजन भवन येथे सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरु वात झाल्यानंतर प्रथम मुख्यनागरी गटातील सर्वसाधारण प्रवर्गातील चार जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात एकूण झालेल्या २०१ मतांपैकी १५ मते बाद झाल्याने १८६ मतेच वैध ठरली. मतमोजणी करताना एका मताचे मूल्यांकन शंभरामध्ये करण्यासोबतच कमाल मतांचा कोटा ३७.२१ अर्थात ३७२१ असा निश्चित करण्यात आला. या कोट्यानुसार मतांचे मूल्यांकन करून मतमोजणीत भाजपाचे योगेश रामराव हिरे यांनी पहिल्याच फेरीत ४७ म्हणजे ४७०० मते मिळवित विजय मिळवला, तर शिवसेनेचे चंद्रकांत महादेव खाडे यांनी ४२ म्हणजे ४२०० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद यांनी ३९ म्हणजे ३९०० मूल्यांकनाची मते मिळवून विजय मिळवला, तर भाजपाचे सुनील गायकवाड यांना ३२०० आणि नंदकुमार वाल्मीक सावंत यांना २६०० मूल्यांकनाची मते पडली. या दोन्ही उमेदवारांनी कोटा पूर्ण न केल्याने त्यांच्यासाठी दुसरी फेरी झाली. त्यात सर्वाधिक मते पडलेल्या योगेश हिरे यांची कोट्यापेक्षा अधिक मते म्हणजे ९७९ कोटा मूल्यांकनाच्या अतिरिक्त मतांची पुनर्मांडणी करूनही सावंत यांना ०.००१ मूल्यांकनाची मते मिळाली. दुसºया क्रमांकाची अतिरिक्त मते मिळवूनही सावंत यांच्या मतांचे मूल्यांकन सर्वांत कमी असल्याने मतमोजणी आणि मूल्यांकन पद्धतीच्या नियमांनुसार चौथ्या जागेसाठी सुनील गायकवाड यांना विजयी घोषित करून सावंत पराभूत झाल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, सकाळी प्रथम संक्र मणकालीन म्हणजेच नगरपंचयात गटाच्या मतमोजणीत निफाडचे राजाराम शेलार यांनी प्रमोद देशमुख यांचा दहा मतांनी पराभव केला. शेलार यांना ५२, तर देशमुख यांना ४२ मते मिळाली, तर मुख्य नागरी गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव गटात दोन जागांसाठी तीन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत भाजपाच्या पुष्पा आव्हाड आणि शिवसेनेच्या आशा अहिरे यांना प्रत्येकी ७६ व मालेगावच्या शानऐहिंद निहाल अहमद यांना ३५ मते पडल्याने त्यांचा पराभव झाला.विजयी उमेदवारमुख्यनागरी गट (सर्वसाधारण)योगेश हिरे (भाजपा)चंद्रकांत खाडे (शिवसेना)अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद (राष्टÑवादी)सुनील गायकवाड (भाजप)इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)पुष्पा आव्हाड (भाजपा)आशा अहिरे (शिवसेना)संक्र मणकालीन गट (सर्वसाधारण )राजाराम शेलार (भाजपा)