शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

योजना ढीगभर; धान्यच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:19 IST

पंचवटी : संपूर्ण देशभरात कोरोना रु ग्ण आढळून येत असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे.

पंचवटी : संपूर्ण देशभरात कोरोना रु ग्ण आढळून येत असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो नागरिकांना अन्नधान्याची अडचण येऊ नये यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांना डाळ, तेल यांसारख्या वस्तू मिळाव्यात यासाठी योजना जाहीर केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात धान्याचा पत्ताच  नसल्याने रेशन दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, अशा तक्रारी करण्यात येत आहे.  पंचवटीत असलेल्या रेशन दुकानातून प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ याप्रमाणे वाटप केला जात आहे तर कुटुंबातील सदस्यांची संख्या शिधापत्रिकेवर नोंद केलेली आहे व आधार कार्डला लिंक असेल तरच त्या संख्येनुसार प्रतिव्यक्ती मोफत तांदूळ दिला जात आहे, तर दुसरीकडे केंद्र शासनाने काही दिवसांपूर्वी रेशन दुकानात डाळ, तेल मिळेल अशा केलेल्या घोषणेनुसार प्रत्यक्षात शिधा पत्रिकाधारकांना फक्त तांदूळ मिळत असल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितले.केंद्र शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात रेशन दुकानात डाळ, तेल या वस्तू पोहोचलेल्या नाही त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांना देणार कसे अशी कैफियत रेशन दुकानदारांनी मांडली आहे. आगामी आठवडाभरात किंवा एक तारखेपासून केसरी कार्डधारकांना ८ रु पये किलो गहू तर १२ रु पये किलो तांदूळ दिला जाणार आहे. आधार कार्डवर धान्य वितरण करण्याबाबत शासनाचे कोणतेही लेखी आदेश नाही. त्यामुळे सध्या आधार कार्डवर धान्य वाटप करता येत नाही.  गेल्या दोन दिवसांपासून अन्नसुरक्षावाल्यांना मोफत पाच किलो प्रतिव्यक्ती तांदूळ दिला जात असल्याने रेशन दुकानात कधी होत नव्हती इतकी गर्दी मोफत तांदूळ घेण्यासाठी नागरिकांची होतआहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे मात्र मोफत तांदूळ  घेण्यासाठी गर्दी करत असल्याने नागरिकांना वारंवार विनंती करावी लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक