शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लॅमरोडवर ठिकठिकाणी खड्डे

By admin | Updated: August 7, 2016 01:58 IST

लॅमरोडवर ठिकठिकाणी खड्डे

देवळाली कॅम्प : कुंभमेळ्याच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या लॅमरोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ‘रस्त्यावर खड्डे का खड्ड्यातून रस्ता’ हा प्रश्न निर्माण होत आहे.मागील वर्षी कुंभमेळा होण्यापूर्वी विशेष निधीतून लॅमरोडचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हाच १५ दिवसांत डांबर वेगळे अन् खड्डा वेगळा असे स्वरूप असलेल्या रस्ता दुरुस्तीनंतर पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेल्याचे ठिकठिकाणी दिसते. अनेक ठिकाणी रस्त्याखाली आणि बाजूची जागा वर असाही प्रकार रस्त्याने साचलेल्या पाण्यावरून लक्षात येतो. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार होत असतांना छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचा ठेका देताना ठराविक वर्षाच्या देखभालीसाठी असल्याचे सांगितले होते.गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे नाका नंबर सहा ते कोठारी सदनपर्यंत अनेक खड्डे रस्त्यालापडले असून, सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत छावणी प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.एसव्हीकेटी महाविद्यालय, लक्ष्मीनारायण मंदिर, ओरिएन्टल गेस्ट हाऊस ते जमात या परिसरात रस्त्यालगत साचणारे पाणी निचरा करण्यासाठी किंवा वाहून जावे याकरिता प्रशासन, लोकप्रतिनिधी कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यासाठी खर्च केलेले सव्वापाच कोटी पाण्यात गेले असल्याची चर्चा लॅमरोडवर रंगत आहे. (वार्ताहर)