शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात घरोघर थेट गॅसपुरवठ्यासाठी पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पालघरच्या प्रकल्पातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिकला गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी गॅसचा साठा करण्यासाठी विल्होळीत स्टेशन उभारण्यात येणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम पालघर ते नाशिक पाइपलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी २५० किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाणार आहे. या कामासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नाशिकमधील पाइपलाइनच्या कामकाजासाठी रोड डॅमेज चार्जेस म्हणून आठ कोटी रुपये कंपनीकडून महापालिकेला अदा करण्यात आले आहेत. तसेच महानगराच्या ज्या भागात खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, त्या परिसरात कंपनीने त्वरित काम सुरू करण्याचे निर्देशदेखील महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. कंपनीने नुकतेच जेलरोड आणि शिंदे, पळसे तसेच पाथर्डी फाटा येथे सीएनजी पंपाच्या कामकाजाला प्रारंभ केला आहे. त्याशिवाय महानगरात अन्यत्र काही ठिकाणी सीएनजी पंप उभारण्याच्या कामालादेखील गती देण्यात येणार आहे.

इन्फो------

गॅस पाइप सुरक्षित

अत्याधुनिक तंत्रप्रणालीमुळे गॅस पाइप ही नेहमीच्या गॅसइतकीच सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच सिलिंडर गॅस संपल्यास पुन्हा नवीन सिलिंडरची प्रतीक्षा करावी न लागता सातत्यपूर्ण पुरवठा कायम सुरू राहतो. त्यामुळेच मुंबईसह अनेक मेट्रो शहरांमध्ये गॅस पाइपलाइनची सुविधा अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे.

इन्फो

मनपाच्या शहर बससाठी सुविधा

महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या शहर बससेवेसाठी महापालिकेच्या जागेत पाच सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मनपाच्या भविष्यातील शहर बससेवेसाठीदेखील हक्काच्या इंधनाची सोय होऊ शकणार आहे.