शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

पिंपळगावी युवकाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: March 7, 2017 23:13 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील सूरज कन्हैयालाल गुप्ता (१७) याचा मृतदेह कादवा नदीपात्रात सापडला.

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील सूरज कन्हैयालाल गुप्ता (१७) याचा मृतदेह कादवा नदीपात्रात सापडला.येथील बांधकाम ठेकेदार कन्हैयालाल छोटू गुप्ता यांचा भीमाशंकर इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणारा मुलगा सोमवारी (दि. ६) दुपारी ४ वाजता घरातून शाळेचे परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. परंतु सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने रात्रभर त्याची शोधाशोध केली. तो मिळून आला नाही. मंगळवारी (दि. ७) दुपारी ३ वाजता कादवा नदीत शिरसगाव रोड येथे त्याचे कपडे दिसल्याने शंका वाढली. अग्निशामक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले असता त्याचा मृतदेह आढळून आला. या बाबतीत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  मित्रासोबत नदीवर पोहाण्यासाठी गेला असता पाण्यात अंदाज न आल्याने सदर घटना घडल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. सूरज कन्हैयालाल यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला लहान तीन बहिणी आहेत. (वार्ताहर)