शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव जलाल शाळेत शिक्षकांत हाणामारी

By admin | Updated: July 9, 2017 00:14 IST

येवला : जिल्हा परिषदेच्या शाळेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकाला शिक्षकाने मारहाण केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकाला शाळेतीलच एका शिक्षकाने सहविचार सभेत मुख्याध्यापकांसमोर शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना कळताच संतप्त ग्रामस्थांनी आदर्श शिक्षकाची बाजू घेत शाळेला कुलूप ठोकले. मुख्याध्यापक मोहन सावंत यांनी आपल्या दालनात सकाळी ८.३० वाजता सहविचार सभा बोलावली होती. बैठकीत शाळेतील शिक्षक राम जावरे यांनी शाळेच्या वेळेसंदर्भात विषय घेतला. शालेय कामकाजासाठी संगणकावर जो पासवर्ड टाकला आहे, त्या संदर्भात उपशिक्षक जावरे यांनी राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांना शिवीगाळ करीत मुख्याध्यापकांच्या दालनात मीटिंगमध्येच जोरदार मारहाण केली. यामुळे संतप्त होत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. ग्रामस्थांनी या घटनेसंदर्भात तालुक्यातील लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी यांना माहिती दिली. गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी मंदाकिनी लाडे यांना या शाळेवर पाठविले. लाडे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थांकडे घटनेसंदर्भात चौकशी केली. शिक्षकांनी अशी वर्तणूक करू नये, असे सांगत दोषींना शासन देऊ, असे आश्वासन देत ग्रामस्थांना शाळेचे कुलूप काढण्याचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी जोपावेतो मुख्याध्यापक सावंत व उपशिक्षक जावरे या दोघांची बदली होत नाही, तो पावेतो शाळेचे कुलूप न काढण्याची भूमिका घेतली. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांनी शाळेबाहेर उपस्थित ग्रामस्थ व शिक्षकांची भेट घेतली.