पिंपळगाव (ब) : शहरातील भाऊ नगर परिसरात मागील भांडणाची कुरापत काढत युवकावर धारदार शस्त्राने वार करण्याची घटना सोमवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये राहुल रतन साळुंखे (रा. भाऊनगर, पारधी वाडा) हा युवक मानेवर चाकूने वार झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. महाविद्यालयात बेंचवर बसण्यावरुन हे भांडण झाल्याचे समजते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव परिसरात भाऊ नगर व आंबेडकरनगर परिसरातील युवकांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. सदर भांडण आपापसात मिटलेही होते. मात्र या भांडणाचा राग मनात धरत आंबेडकर नगर परिसरातील युवकांनी भांडणाची कुरापत काढत भाऊ नगर परिसरात येऊन राहुल रतन साळुंखे या युवकाच्या मानेवर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी राहुलवर नाशिक येथील लोकमान्य रु ग्णालयात उपचार सुरु असून त्याचा भाऊ पुंडलिक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मोहित गांगुर्डे (रा. राजवाडा, आंबेडकरनगर) व अन्य दहा ते बारा जणांवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे, कॉन्स्टेबल अमोल जाधव, दुर्गेश बैरागी, रवी चिने,मनोज बोराळे, आदी तपास करत आहेत.घटनेचा निषेधसदर घटनेचा निषेध करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक बिपीन शेशेवाळे यांना निवेदन देण्यात येऊन कारवाईची मागणी करण्यात आली. आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी तसेच पिंपळगाव बसवंत मधील गुंड प्रवृत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर ज्ञानेश्वर माळे, राहुल पवार, सागर माळे, मुकेश खरे, योगेश साळुके, आबा दाभाडे, अमोल सोनवने,अलका माळे,चंद्रकला साळुंखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, जखमी युवकावर उपचार करण्यासाठी परिसरातील त्याच्या मित्रांनी वर्गणी काढून पैसे जमा केले.
पिंपळगावी युवकावर धारदार शस्त्राने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:21 IST
गंभीर जखमी : महाविद्यालयात बेंचवरुन वाद
पिंपळगावी युवकावर धारदार शस्त्राने वार
ठळक मुद्देराहुल रतन साळुंखे (रा. भाऊनगर, पारधी वाडा) हा युवक मानेवर चाकूने वार झाल्याने गंभीर जखमी जखमी राहुलवर नाशिक येथील लोकमान्य रु ग्णालयात उपचार सुरु