पिंपळगाव बसवंत : गेल्या दशकापासून पिंपळगाव बसवंत घनकचºयाची विल्हेवाट कशी करावी त्याचे व्यवस्थापन कश्या पद्धतीने करावे यावर या बाबत चर्चा सुरू होती पण त्यावर अजूनही कुठलाच उपाय झाला नाही. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत प्रशासनाची भेट घेतल्याने पिंपळगावच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाल्याने या चर्चेला पूर्ण विराम लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील घनकचºयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुश्रीफ यांची भेट घेऊन पिंपळगांव बसवंत गावच्या विविध समस्या मांडून, घनकचरा विल्हेवाट कशा पद्धतीने करता येईल, काय उपाय योजना राबविता येतील आदी विषयांवर चर्चा करण्यात आल्या. घनकचºयाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते. त्या प्रकल्पाला भेट दिली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, बापु कडाळे, दिपक विधाते, राहुल बनकर, बाळा बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते.
पिंपळगावच्या घन कचऱ्याचा प्रश्न लागणार लवकरच मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 19:41 IST
पिंपळगाव बसवंत : गेल्या दशकापासून पिंपळगाव बसवंत घनकचºयाची विल्हेवाट कशी करावी त्याचे व्यवस्थापन कश्या पद्धतीने करावे यावर या बाबत चर्चा सुरू होती पण त्यावर अजूनही कुठलाच उपाय झाला नाही. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत प्रशासनाची भेट घेतल्याने पिंपळगावच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाल्याने या चर्चेला पूर्ण विराम लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पिंपळगावच्या घन कचऱ्याचा प्रश्न लागणार लवकरच मार्गी
ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार