शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

पिंपळगाव टोल वसुली २३ पर्यंत स्थगित

By admin | Updated: May 21, 2014 00:40 IST

नाशिक : स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल वसुलीला २३ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक : स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल वसुलीला २३ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. नाशिक शहरातील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने या उड्डाणपुलापोटी पिंपळगाव बसवंत येथील टोल दरात वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनीने घेतला आहे. त्यासाठी अगोदर १२ मेचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला; परंतु स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविल्याने आठ दिवस दरवाढीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा वृत्तपत्रातून जाहिरात देऊन मंगळवार, दि. २० मेपासून वाढीव टोलवसुली केली जाईल असे जाहीर केले; मात्र सोमवारी याची माहिती मिळताच, पिंपळगाव येथील नागरिक व लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला. त्यावर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरा पिंपळगाव पोलीस ठाण्यात बैठकही घेण्यात आली; परंतु रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, ओझर येथे उड्डाणपूल उभारावा व काही ठिकाणी भूमिगत मार्ग करण्याची मागणी लावून धरल्याने या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपर्क साधला असता, येत्या २३ मे रोजी त्यांनी बैठक घेण्याचे निश्चित केल्याने आता या बैठकीनंतरच वाढीव टोल वसुलीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खोडस्कर यांनी सांगितले.