शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत शहर जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:08 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. पाराशरी नदीला पूर आला असून, अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चिंचखेड चौफुली भागात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३च्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावर पाणी : सर्व्हिसरोडवर वाहतूक ठप्प

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. पाराशरी नदीला पूर आला असून, अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चिंचखेड चौफुली भागात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३च्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. संततधार पावसामुळे या खड्ड्यांचा आकार वाढून त्यात पाणी साचले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे रहदारी ठप्प झाली आहे. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी गेली होती. त्यावेळी सर्व्हिस रोडचे काम करणे गरजेचे होते. परंतु रस्ते प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे खड्डे पडून हे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पराशरी नदीला पूर...पिंपळगाव बसवंतच्या पराशरी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागल्याने आहेरगावचा पिंपळगावशी संपर्कतुटला आहे. आठवडे बाजाराचा व्यावसायिकांना फटका बसला. पिंपळगाव बसवंतचा रविवारी आठवडे बाजार असल्याने शुक्रवारी व शनिवारी अहोरात्र पडणाºया पावसामुळे रविवारी आठवडे बाजार असूनदेखील दुकाने बंद अवस्थेत होती. त्यामुळे व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करावा लागला.सर्व्हिसरोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक गाड्यांचे नुकसान होऊन वाहनचालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने वेळोवेळी प्रशासन अधिकारी, कर्मचाºयांना तोंडी व लेखी निवेदन देऊनसुद्धा आजपर्यंत दुरुस्तीचे काम झाले नाही.याचाच परिणाम म्हणून या खड्ड्यांत पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून तसेच इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने नादुरुस्त होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनाडी नाल्याला पूर ...... सतत पडणाºया पावसामुळे शहरातील मनाडी नाल्याला पुराचे स्वरूप आल्याने मनाडी नाल्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानदाराचे नुकसान झाले आहे.आठवडे भाजीपाला बाजारपेठ शुकशुकाट .जिल्हाभरात पावसाने थैमान घातले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आठवडे बाजारपेठला पावसामुळे जणू मंदीचा वेढा पडला असून,बाजारपेठत शुकशुकाट होता.