शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव (ब) : कांदा व्यापाऱ्याचे अपहरण प्रकरण

By admin | Updated: August 24, 2016 01:10 IST

आठ जणांना जन्मठेप

नाशिक : पिंपळगावच्या एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आठ संशयिताना निफाड सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांच्या तपासपद्धतीवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.पिंपळगावचे व्यापारी शंकर मूलजी ठक्कर यांचे १९ डिसेंबर २०१२ साली खंडणी वसुलीसाठी आरोपींनी कांद्याच्या चाळीमधून अपहरण केले होते. ठक्कर यांचा भाऊ करसन यांच्याकडे पंधरा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी आरोपींनी फोनवरून केली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास भावाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून खरशिंदे (नगर) गावातच पाच कोटीच्या रोकडसह एकूण अकरा संशयित आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याची सुनावणी निफाड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जे. मंत्री यांच्या समोर झाली. या खटल्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सरकारी पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले. त्यात आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयाने आठही आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यातील तीन संशयितांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मिसर यांना अ‍ॅड. सुरेश गायकवाड यांनी सहकार्य केले. पाच कोटी देऊन तडजोडआरोपींशी तडजोड करून ठक्कर यांनी पाच कोटी रुपयांची खंडणीची रक्कम निश्चित केली होती, मात्र गुन्ह्णाचे गांभीर्य बघता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींचा माग काढला; मात्र तत्पूर्वी करसन याने भावाची सुटका करण्यासाठी आरोपींना खरशिंदे शिवारात पाच कोटी रुपयांची रक्कम दिली होती. त्यावेळी आरोपींनी शंकरला करसनकडे सोपविले मात्र शंकरच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या, हाच मोठा पुरावा ठरला. संभाषणावरून मिळाले लोकेशनआरोपींनी फिर्यादी करसनसोबत भ्रमणध्वनीवरून वेळोवेळी केलेल्या संभाषणावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल टॉवर लोकेशन घेऊन आरोपींचा माग काढला. पोलिसांना यामध्ये यश आले आणि खरशिंदे गावातून पसार होण्याअगोदरच पोलिसांनी आठ आरोपींच्या रोकडसह मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे, काडतुसे, चिलखत, अनेक मोबाइल पोलिसांनी जप्त केले होते.असे आहे शिक्षेचे स्वरूप न्यायालयाने आठही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कलम ३८६अन्वये पाच वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, कलम ५०६ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीनशे रुपये दंड, कलम ३९५ व ३९७ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी सातशे रुपये दंड, कलम ३४७ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीनशे रुपये दंड, कलम १२०(ब)नुसार शिक्षा सुनावली आहे.यांना झाली शिक्षासचिन दामोदर पाटील (२५), तुषार विक्रम बैरागी (२०) (दोघे रा. पिंपळगाव), मुलानी दाऊन हुसेन (२१, रा. पाचोरे वणी), सागर विजय गवळी (२१, रा. बेहेड), अर्जुन मधुकर रहाणे (२५, रा. सुकेणे), योगेश दौलत गडाख (२१, रा. पाचोरे वणी), संतोष मनोहर हतांगळे (२५, रा. शांतीनगर) विश्वजित ऊर्फ सोनू किरण थेटे (२४, रा. शिवाजीनगर) या आठ आरोपींविरुद्ध खंडणी वसुलीसाठी अपहरण व मारहाणीचे गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना विविध गुन्ह्णांमध्ये जन्मठेप व सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. यांची झाली निर्दोष सुटकाया गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले संशयित सुनील भाऊराव पिठे (१९), कोंडाजी चंद्रभान वाडेकर (२१), बाळासाहेब भागवत वाडेकर (२४) यांच्याविरुद्ध न्यायालयाला सबळ पुरावे आढळून न आल्याने सत्र न्यायालयाने या तिघा संशयितांची निर्दोेष सुटका केली आहे. लहान गुन्हेगारी क्षेत्रात खंडणी वसुलीसाठी व्यापाऱ्यांच्या मुलांचे अपहरण करणे, तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. पोलिसांनी गुन्ह्यांचा गांभीर्याने सखोल तपास करण्यावर भर देण्याची गरज आहे.- अ‍ॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील